श्रेयश वानखेडे:
दरवर्षी 8 मार्च ला जागतिक महिला दिन जगात फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.
खरं म्हणजे या दिवशी महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात व त्यांचे होत असलेले शोषण थांबण्याकरिता अधिकाधिक जोराने प्रयत्न करण्याचे मानस या महिला दिनाच्या माध्यमातून समाजात रुजविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
परंतु आजकाल या प्रश्नाला बगल देऊन फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम पुरताच महिला दिन राहिला का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
समाजात अजूनही महिलांवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार व शोषण होत आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला चे हाल फार बिकट आहे. या महिला खाजगी क्षेत्रात काम करत असताना त्यांना शासनाने निर्धारित केलेल्या नुसार जतन मिळत नाही किंवा त्यांना कोणतीही सुविधा दिल्या जात नाही त्यामुळे ते नेहमी आर्थिक समस्येत राहत गरिबी रेषेच्या बाहेर निघू शकत नाही.
कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. येथे बहुतांशी महिला शिक्षिका कार्य करत असून येथील संस्थाचालक शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणे या महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कामे तर करून घेतात परंतु शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार वेतन व इतर सुविधा देत नाही सेवानिवृत्त झाल्यावर त्यांन ग्रॅच्युइटी इतर लाभ पासून वंचित राहावे लागते एवढी दयनीय स्थिती जर उच्चशिक्षित महिलांचे समाजात होत असेल तर अन्य महिलांची या बाबतीत काय स्थिती आहे याची कल्पनाच केलेली बरी.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद या बाबतीत सतत आवाज उठवित असून अशा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. महिला दिनाच्या या प्रसंगी सरकारने खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण करायचे असल्यास यांना न्याय द्यावा हे विनंती महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे कॉन्व्हेंट स्कूलचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी शासनाला केली आहे.