Wednesday, May 6, 2026
HomeParbhaniश्रीराम संस्कार केंद्राच्या वर्गास प्रारंभ.
spot_img

श्रीराम संस्कार केंद्राच्या वर्गास प्रारंभ.

श्रीराम संस्कार केंद्राच्या वर्गास प्रारंभ.

श्रेयश वानखेडे:
सेलू येथील श्रीराम संस्कार केंद्राच्या वतीने आपल्या देशाची भावी पिढी बलशाली व संस्कार क्षम घडविण्यासाठी विविध उपक्रमातून मागील दहा वर्षांपासून  किशोरवयीन वयोगटातील मुला मुलींसाठी सेलूच्या विविध भागात संस्कारवर्गाचे आयोजन करीत आहे. दिनांक ३० मार्च रोजी गुढीपाडव्यापासून  सेलू शहराच्या विविध भागासह श्री विवेकानंद नगरातील गजानन महाराज मंदिरात संस्कार वर्गास प्रारंभ झाला. ६ एप्रिल पर्यंत सायंकाळी चालणाऱ्या या वर्गात ‌शारिरीक स्वास्थ्यासाठी अभ्यास पुरक उपक्रमात ॐकार,ध्यान, योग-प्राणायाम मनःशांती, एकाग्रता,आत्मबल,आत्मविश्वास वाढीसाठी सूर्य नमस्कार, राम रक्षा, मारोतीस्तोत्र, समर्थबोध, मूल्य संस्काराच्या प्रेरक कथा, प्रार्थना व विविध गुणदर्शना विषयी सौ.हेमलता जोशी, सौ.लोकुलवार,सौ. अपर्णा कुलकर्णी  ( पारीख कॅलनी) सौ.करूणा बागले,सौ.आशाताई सूर्यवंशी, सौ. माधवी पिंगळे ( विवेकानंद नगर) सौ.सुरेखा रामदासी सौ.सीमा आष्टीकर, सौ.वैष्णवी दलाल( विद्यानगर) सौ.वसुधा खारकर,सौ.किर्ती देऊळगावकर सौ.संगीता खारकर, ( आदर्श नगर ) सौ.पद्मजा खारकर,सौ.सरिता उमरीकर, सौ.साधना सराफ ( राम मंदिर गल्ली )  बाबासाहेब चारठाणकर (अत्रेनगर) सौ. अर्चना बारगजे, सौ.आदिती लोहरेकर,सौ.मेघना दिवाळकर ( श्रीराम काॅलनी )या भगिनी मार्गदर्शन करणार आहेत. पालकांनी आपल्या मुला मुलींना परिसरातील संस्कार केंद्रात पाठवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सेलूच्या केंद्र प्रमुख सौ.हेमलता जोशी यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page