येनबोडी येथे पर्यावरण प्रबोधन आणि पक्षी जलपात्र वितरण कार्यक्रम संपन्न
श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथील कर्मवीर विद्यालय व क. महाविद्यालय येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका मा. नलिनी पडोळे, प्रमुख पाहुणे मा. मोहम्मद शरीफ अध्यक्ष, पर्यावरण वाहिनी, मा. विनायकराव साळवे,मा. मनोहर माडेकर, ज्येष्ठ शिक्षक सुभाष लोहे, प्रा. राजेश देवाळकर, हरित सेना प्रमुख मा. नरेंद्र वांढरे आणि आयोजक राजेश वाळके उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी पर्यवरणाचा होणारा ऱ्हास आणि पशु पक्ष्यांच्या अस्तीत्वाबद्दल चिंता व्यक्त केली. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी उपलब्ध होत नाही, त्यांचे नाहक जीव जातात त्यामुळे जर आपण घरोघरी पक्ष्यांकरिता जलपात्रांची सोय केली तर ती त्यांच्याकरिता जीवनदायीनी होऊ शकते आणि पक्ष्यांना पाणी दिल्याचे समाधान आपल्याला मिळू शकते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक वर्गास एक जलपात्र वितरित करण्यात आले. आणि त्याचा उपयोग पक्ष्यांच्या पाण्याकरिता कसा करावा याचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
शेवटी सुभाष लोहे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.