श्रेयश वानखेडे:
भिक्षुनिवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर तर्फे सतत 18 तास अभ्यास करुन महामानवाने मानवंदना देण्याचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी 6 वाजता प्रणाली भसारकर (देशमुख), ध्रीती सातारडे याच्या तथागत गौतम बुद्ध, डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतीमांचे पुजन करुन सुरु झाला. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरु केला. एडीनबर्ग (लंडन) येथुन शिक्षण घेऊन आलेला जय भारत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच प्रतिक भगत नोएडा, साहील डुंबेरे दिल्ली, यांनीही मार्गदर्शन केले. धम्ममित्र भास्कर भगत यानीही मार्गदर्शन केले. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करुन महामानवांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र संपत कोरडे, जयदास भगत, ताराचंद थुल, तुळशीदास खैरे, नरेंद्र जानगे, प्रकाश देवगडे, बाळू महेशकर, ईत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या दरम्यान नाश्ता, दोनदा जेवन, ज्युस, आईस्क्रीम देण्यात आला. सांगता महापुरुषांच्या जयघोषनेने व धम्मपालन गाथेने पार पडला.