Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeJayantiमहात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 

श्रेयश वानखेडे:

आधुनिक भारताचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे इतिहास विभागाद्वारे साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात क्रांतीसूर्य महात्मा फुले, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, तर प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. किशोर चौरे(इतिहास विभागप्रमुख), प्रा. रोशन साखरकर, प्रा.दिवाकर मोहितकर, प्रकाश मेश्राम, वरिष्ठ लिपिक याची विचार मंचावर उपस्थिती होती. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.रजत मंडल यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा दिल्या, तर डॉ. किशोर चौरे(इतिहास विभागप्रमुख) यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, ” बाबासाहेब या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न असून त्यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून सर्व घटकांना हक्क मिळवून दिले. तसेच त्यांनी विविध विषयावर सखोल असा अभ्यास करून सर्वाना समान संधी उपलब्ध करून दिली. स्त्री विषयक सुधारणा, कामगारांविषयी कायदे करून इतकंच नव्हे तर ‘ सामाजिक व आर्थिक विषयक विचार महत्वपूर्ण ठरतात’ यावेळी कार्यक्रमाला डॉ. बालमुकुंद कायरकर,  प्रा. सतिश कर्णासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page