Monday, May 25, 2026
HomeEducationइयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये:- राहुल पावडे
spot_img

इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये:- राहुल पावडे

इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये:- राहुल पावडे

भाजप महानगर तर्फे शिष्टमंडळांनी दिले शिक्षणाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन

Shreyash Wankhede: नुकताच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांची पुढील वर्गात प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. सोबतच यावर्षीपासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन झालेली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या टक्केवारीच्या अनुषंगाने आवडीच्या व सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे कठीण होवू नये त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार प्रवेश मिळावा याकरिता विषयनिहाय विद्यार्थी कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.२०) ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सदर निवेदन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी मनोज सिंघवी, चांद सय्यद, अजय सरकार, रवी लोणकर, राजेंद्र खांडेकर संजय निखारे, प्रमोद क्षीरसागर, आकाश ठुसे, बंडू गौरकर, रणजीत डवरे, तेजा सिंग, प्रलय सरकार, सुरज सिंग, चंदन पाल, महेश झिटे, प्रवीण गुरुमवार, बाळू कोलनकर, मधुकर राउत, यांची उपस्थिती होती.

यावेळी राहुल पावडे म्हणाले की, नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला आहे. त्या अनुषंगाने इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ करण्यात यावी व ज्या विद्यार्थ्यांना त्यांना दहाव्या वर्गात मिळालेल्या पुरेशा टक्केवारीच्या अभावी प्रवेश मिळाला नाही, तर अशा विद्यार्थ्यांकरीता अकरावी साठी विशेष कोटा वाढवुन देणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी चांगले टक्के घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत, तर काही विद्यार्थी टक्केवारीत कमी पडले. चांगली टक्केवारी मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीची उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश मिळेल मात्र ज्यांना कमी टक्केवारी मिळाली अशा विद्यार्थ्यांना पुढे पसंतीनुसार प्रवेश घेण्यास अडचण निर्माण होणार, अशा परीस्थितीत त्यांना कोणतीही अडचण होऊ नये व त्यांना सुध्दा सुलभ तथा पसंतीनुसार प्रवेश मिळावा, याकरीता आपण आपल्या माध्यमातुन प्रत्येक विद्यालयात प्रवेशाची प्रक्रिया सुलभ होण्याकरीता, अशा विद्यार्थ्यांकरीता, त्यांना त्यांच्या विद्यालयात विषयनिहाय जागेचा कोटा वाढवुन देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांनी भाजप शिष्टमंडळाला या मागणीवर आपण तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page