Sunday, April 26, 2026
HomeSanghtanaसरपंच पदाची सोडत नव्याने काढा - सचिन राजुरकर
spot_img

सरपंच पदाची सोडत नव्याने काढा – सचिन राजुरकर

सरपंच पदाची सोडत नव्याने  काढा – सचिन राजुरकर

Shreyash Wankhede:

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी नव्याने सोडत काढून 27 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी  दिनांक 20 जून 2025 ला मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री  आणि मुख्य निवडणुक अधिकारी यांचे कडे आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक अधिकारी चौधरी  यांचे कडे निवेदन देऊन केली आहे. 4 एप्रिल 2025 अन्वये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम 1964 मधील नियम पोट नियम (3), (4 ), (5 )व (6 )मधील तरतूदी नुसार अनुसूचित जाती /जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग व स्त्री प्रवर्गातील सरपंच पदे तसेच सर्वसाधारण जागा व स्त्री यासाठी आरक्षित करायची पदाची कारवाई ग्रामविकास विभागाने मार्च 2025 ला सरपंच पदाची आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती, आणि चंद्रपुर जिल्ह्यात दिनांक 23 एप्रिल 2025 ला चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 92 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सोडत काढल्या होत्या, त्यात चिमूर तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकही सरपंच पद राखीव ठेवण्यात आले नाही.  दिनांक 6 मे 2025 ला मान. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण 27 टक्के मान्य केले असल्याने, महाराष्ट्रातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दिनांक 23 एप्रिल 2025 ला काढलेली सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण करण्यात यावे. यासाठी निवेदन देण्यात आले या वेळी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदूकिशोर वाढई, ॲड. देवा पाचभाई, सरपंच इंदुबाई पोले, स्नेहा साव, संध्याताई पाटील, नर्मदा बोरेकर, निर्मला दडमळ, सोनाबाई हनवते, मंगला कलेवाड इत्यादी सरपंच आणि दीपक पिंपळशेंडे,  वैभव क्षीरसागर,  सुरज देवाडकर, संतोष झाडे उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page