Saturday, June 6, 2026
HomeParbhaniराज्य सेपक टकारा स्पर्धेस परभणी जिल्हा वरीष्ठ गट संघ रवाना.
spot_img

राज्य सेपक टकारा स्पर्धेस परभणी जिल्हा वरीष्ठ गट संघ रवाना.

राज्य सेपक टकारा  स्पर्धेस परभणी जिल्हा वरीष्ठ गट संघ रवाना.

श्रेयश वानखेडे  : महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन मान्यतेने नाशिक जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने नाशिक येथे दि. 28 ते 30 जून 2025 दरम्यान राज्य सिनियर पुरुष महिला सेपक टकारा क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.याकरिता सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणी वतीने परभणी जिल्हा सेपक टकारा पुरुष  संघाची निवड चाचणी आयोजन दि. 21 जून 2025 रोजी जिजाऊ ज्ञानतीर्थ मा.विद्यालय मानवत रोड रेल्वे स्टेशन, करण्यात आली. या प्रसंगी पर्यवेक्षक सुरेश भिसे  व क्रीडा शिक्षक माणिक मगर , गणेश माळवे, कैलास टेहरे उपस्थित होते.दि. २२ ते २६ जुन दरम्यान नूतन विद्यालय सेलू येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. दि. २७ जून रोजी परभणी जिल्हा पुरुष संघ राज्य सेपक टकारा क्रीडा स्पर्धा नाशिक येथे रवाना झाला.परभणी जिल्हा सेपक टकारा संघातील खेळाडू:- अनुराग आंबटी,विजय चौधरी , निलेश बानाटे,  साई पोफळे , रामराव कांदे,आर्यन गायके, निलेश काळके ,पांडुरंग केंद्रे, जगदीश लहाने, गणेश आम्ले भिसे जितेश , ऋषिकेश मुंढे, शुभम पवार, ईश्वर अर्जुने,विनोद सोळंके  संघ प्रशिक्षक कैलास टेहरे, राज्य स्पर्धेस जिल्हा अध्यक्ष आ. राजेश विटेकर, नितीन लोहट, राजेंद्र मुंढे,मोहम्मद इकबाल, बाबासाहेब राखे, गणेश माळवे, सज्जन जैस्वाल, प्रशांत नाईक, अब्दुल अन्सार, यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page