अल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड : चोरीचे ५ गुन्हे उघड, तीन आरोपी अटक
श्रेयश वानखेडे :- अल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले असून चोरीचे ५ गुन्हे उघड केले. यात तीन आरोपींना अटक करून ५ लाख ३३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. देवेंद्र उर्फ गोलु महादेव गेडाम (२५) रा. वार्ड नं.४ दुर्गापूर, पवन कॉग्रेस दुर्गे, (२९) रा. कोयना गेट, सिनाळा, विष्णुदेव भिमराव नैताम (२२) रा. डोनी ता. मुल असे आरोपींचे नाव आहे.
. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक १४ जुलै रोजी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहितीनुसार पडोली परिसरात सापळा रचुन आरोपी देवेंद्र उर्फ गोलु महादेव गेडाम वय २५ वर्ष रा. वार्ड नं.४ दुर्गापूर, पवन कॉग्रेस दुर्गे, वय २९ वर्ष रा. कोयना गेट, सिनाळा, विष्णुदेव भिमराव नैताम वय २२ वर्ष रा. डोनी ता. मुल यांना ताब्यात घेवुन त्यांचा ताब्यातील पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यात १६७ किलो अल्युमिनियम तार किंमत ३० हजार ६० रुपये, ग्रायंडर मशीन ३ हजार रुपये किंमतीचे मिळुन आल्याने त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन पडोली अप.क. २३२/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३, पोलीस स्टेशन कोठारी अप. क्र.४२/२०२५ कलम १३६ भारतीय विद्युत अधिनियम २००३, पोलीस स्टेशन कोठारी अप.क्र.४४/२०२५ कलम १३६ भारतीय विद्युत अधिनियम २००३, पोलीस स्टेशन मुल अप.क्र. २२८/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३, पोलीस स्टेशन मुल अप. क्र. २३२/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ अशा ५ चोरीचे गुन्हे केले असुन सदर चोरीच्या गुन्हयातील सदर अल्युमिनियम तार असुन ते विक्री करीता नेत असल्याचे सांगितल्याने सदर चोरीचा माल आणि गुन्हयात वापरलेली पिकअप वाहन असा एकुण ५ लाख ३३ हजार ६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी पडोली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा नितीन कुरेकार, पोहवा नितीन साळवे, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुरेद्र महंतो, पोहवा रजनीकांत पुट्टावार, पोहवा सुभाष गौरकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा इमरान खान, पोअं मिलींद जांभुळे, पोअं प्रफुल्ल गारघाटे, पोअं शशांक बदामवार, पोअं किशोर वाकाटे, पोअं हिरालाल गुप्ता, चापोअं मिलींद टेकाम आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर टिम यांनी केली आहे.