जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचे भूसंपादन नियमबाह्य व दडपशाहीने होत असल्याने शेतकरी आमरण उपोषण करणार.
उपविभागीय अधिकारी साहेब, सेलु यांना निवेदन सादर.

श्रेयश वानखेडे: सेलू तालुक्यातील नऊ गावातील शेतक-यांची जमिन संपादित होत आहे.जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचे भूसंपादन नियमबाह्य व दडपशाहीने होत असल्याने शेतकरी नाराज झाले असून शेतक-यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासन विरोधात सर्व बाधित शेतकरी यांनी मा. उपजिल्हा धिकारी यांना आमरण उपोषण करण्याचा इशारा देत निवेदन सादर केले असून त्यामध्ये जमिनीचा बाजार भाव 2018 च्या शासकीय रेडिरेकनर नुसार कवडीमोल एक लाख अंशी हजार एकरी फक्त एवढा दर जमिनीला दिला जात आहे, सबळ पुरावे देऊनही जमिन कोरडवाहू व हंगामी धरण्यात आली आहे, फळबाग मुल्यांकन कृषी विभागाने बेअरींग मध्ये काढुनही रोपे धरण्यात आली आहेत, ईतर बाबींचे , विहीर, पाईपलाईन,घरे यांचे मुल्यांकन योग्य प्रकारे केले नाही. या अन्याया विरोधात उद्या दि. १४/०८/२०२५ गुरुवार पासुन बेमुदत आमरण उपोषण उपविभागीय कार्यालय सेलू येथे करणार आहेत. या निवेदनवर रामेश्वर गाडेकर, प्रशांत नाईक, रमेश माने, गणेश मुंडे, दता देशमाने, मारोती बोडखे,जिवन गाडेकर, रघुनाथ टाके, सुनिल लिपणे, दता गाडेकर, गोविंद गाडेकर,निशांत मुंडे यांच्या स्वाक्षरी आहेत.