Sunday, September 13, 2026
spot_img
HomeSanghtanaमराठा सेवा संघ स्थापना दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मराठा सेवा संघ स्थापना दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मराठा सेवा संघ स्थापना दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Jyotsna Wankhede मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड तालुका बल्लारपूर यांच्या वतीने मराठा सेवा संघाचा स्थापना दिन बामणी (दु.) येथील सांस्कृतिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संघटनेच्या ३५ वर्षांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा आढावा घेण्यात आला.
       कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षस्थानी शिवश्री दिपक खामनकर जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ होते. उद्घाटन सरपंच प्रल्हाद अलाम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शिवश्री चंद्रकांत वैद्य, उपसरपंच सुभाष ताजणे, सहदेव देरकर सामाजिक कार्यकर्ता व वाजीद खान जमाते इस्लामी हिंद, बल्लारपूर उपस्थित होते.
        या वेळी तालुकाध्यक्ष सुरेश पंदीलवार, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर माडेकर, उद्योजक चंद्रकांत वैद्य, सरपंच प्रल्हाद अलाम, सुभाष ताजणे, सहदेव देरकर व वाजीद खान यांनी आपले विचार व्यक्त केले. मराठा सेवा संघ ही बहुजन विकासाची वैचारिक चळवळ असून शिक्षण, उद्योग व समाज प्रबोधनाचे कार्य संघटनेमार्फत होत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
          शहीद भगतसिंग वाचनालय, बामणी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, विसापूर येथील ज्ञानेश्वर मेश्राम, मोहित गोरघाटे, धम्मदिप वाघमारे, मंगेश फरकडे, प्रतिक राजूरकर, गायत्री राऊत, हर्शा राऊत, अंकित बन्सुले, सचिन जीवतोडे, भुवन देरकर, आदर्श देरकर, प्रज्वल धोटे, शुभम कांबळे, योगेश तांदुळकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
        सन्मानचिन्हाचे प्रायोजक शिवश्री योगेश वरारकर होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका सचिव नितीन वरारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्षा शोभाताई माडेकर यांनी मानले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page