Wednesday, September 23, 2026
spot_img
Homeबल्लारपूर'ते पन्नास दिवस' ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविल्यास खबरदार..!

‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविल्यास खबरदार..!

‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविल्यास खबरदार..!

Jyotsna Wankhede:
पवन भगत यांच्याद्वारा लिखित ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी मराठी अभ्यासक्रमातून हटवा, अशी मागणी ९ डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कथीत विद्वत परिषदेत सदस्य डॉ. संगीता जगताप आणी डॉ. हेमंत देशमुख यांनी जातीय द्वेष भावनेतून केली असून या कदंबरीतील हिंदू- मुस्लिम,दलित- ब्राम्हण यांच्यातील एकोपा,देशाप्रती समर्पित भावना व मानवतेचा संदेश या कथीत विद्वानांना  दिसला नसेल का..? कोरोना काळात श्रमिकांचे,कष्टकऱ्यांचे झालेले हाल, दुःख, उपेक्षा या वास्तविक बाबी या कादंबरीचा विरोध करणाऱ्यांना जाणवत नसेल तर या कथीत विद्वांनाना. त्याची जागा दाखवून द्यावी लागेल,असा इशारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक, पुरोगामी साहित्य संसदेचे माजी राज्य अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष मनोज मोडक यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
 मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. काशीनाथ बहाटे यांनी ही कादंबरी अभ्यासक्रमात घेण्यामागील भूमिका विषद करत दलित साहित्यांचा देखील उल्लेख केला.तरीही जातीय मानसिकतेतून ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविण्याची मागणी करण्यात येणे या पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे सोनारकर यांनी म्हंटले आहे.
*कथीत विद्वानांनी लेखकाची जात वाचली पण कादंबरी वाचली नाही- ऍड.योगिता रायपूरे*
ते पन्नास दिवस या कादंबरीचे लेखक आंबेडकरवादी विचाराने प्रेरित असल्याने कोरोना काळातील भिषणतेला वास्तविक पद्धतीने मांडण्याचा या कादंबरीतून आटोकाट प्रयत्न झाल्याने जातीच्या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या कथीत विद्वानांनी कादंबरी न वाचता लेखकाची जात वाचून या कादंबरीचा विरोध करणे सुरु केल्याची संतप्त प्रतिक्रिया पुरोगामी साहित्य संसदेच्या राज्य अध्यक्षा ऍड. योगिता रायपुरे यांनी दिली आहे.
दरम्यान या कादंबरीला अभ्यास क्रमातून हटविल्यास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ द्वारे संलग्नीत अन्याय आत्याचार निवारण समिती,पुरोगामी साहित्य संसद राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष  विजय सूर्यवंशी केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब अढांगडे यांच्या नेतृत्वात राज्यभर तीव्र निदर्शने करेल असा ईशारही नरेंद्र सोनारकर यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page