Tuesday, September 15, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूरमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाचा कला गौरव व सत्कार सोहळा

बल्लारपूरमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाचा कला गौरव व सत्कार सोहळा

बल्लारपूरमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाचा कला गौरव व सत्कार सोहळा

ज्योत्स्ना वानखेडे: महाराष्ट्र पत्रकार संघ, बल्लारपूर शाखेच्या वतीने आयोजित कला गौरव व सत्कार महोत्सव निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीने व टाळ्यांच्या गजराने भरून गेले. समाज, पत्रकारिता, कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानाची दखल घेणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई होत्या. उद्घाटन बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पेपर मिलचे महाव्यवस्थापक प्रवीण शंकर, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, नगरपरिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवचंद द्विवेदी, डॉ. अनिल वाढई व जिल्हाध्यक्ष अजय रासेकर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
          या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ रत्नांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. अंकिता वाघमारे, साक्षी जयसवाल, दुर्गेश्वरी द्विवेदी, ॲड. बालाजी विधाते, इंद्रजीत रॉय, यश पेंदे, पांडुरंग जरीले, हेमंत मानकर, मनिष तावाडे तसेच मोहित इटनकर यांना शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
         यासोबतच नगरसेवक विनोद उर्फ सिक्की यादव, महिला व बालकल्याण सभापती ॲड. मेघा भाले, नगरसेविका प्रियंका थूलकर, सुनीता जीवतोडे, नगरसेवक अविनाश मठ्ठा, मनोज बेले, राजेंद्र आर्य, शाखा अभियंता वैभव जोशी, संजय तिवारी, संजय घुगलोत, संजय रामटेके व ॲड. संजय बोराडे यांनाही सन्मानित करण्यात आले.
       अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई म्हणाल्या, “पत्रकार हे समाजाचे प्रतिबिंब आहेत. कला व संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांचे योगदान अनन्यसाधारण आहे.” उद्घाटक पोलीस निरीक्षक बिपिन इंगले यांनी पत्रकार व प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगत, निर्भीड व जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे प्रवीण शंकर यांनी सत्कारामुळे गुणवंतांचा उत्साह वाढतो, असे सांगितले; तर ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांनी पत्रकारितेतील बदल व जबाबदाऱ्यांवर भाष्य केले.
         कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पत्रकार संघ, बल्लारपूर शाखेचे अध्यक्ष रमेश निषाद यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष शांतीकुमार गिरमिल्ला, धनंजय पांढरे, विशाल डुंबेरे, राजू राठोड, शिवदास शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन विशाल डुंबेरे यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page