पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बल्लारपूर यांना पडला प्रथम अपिलीय अधिकारी यांचे नाव व पद लिहिण्याचा विसर
माहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर करून पोलीस स्टेशन बल्लारपूर मधील कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती मागितली होती.
ती माहिती जनमाहिती अधिकारी तथा पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बल्लारपूर यांनी शासन परिपत्रकानुसार नाकारली आहे.
परंतु समाधान न झाल्याने प्रथम अपील सादर करण्यासाठी, प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचे नाव व पद लिहिण्याचा विसर त्यांना पडला असल्याचे पत्रावरून कळते.
पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये जो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बोर्ड लावून आहे. त्यावर सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यांचे पद देऊन आहे. जनमाहिती अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी (पोलीस) राजुरा तसेच प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे नाव देऊन आहे.
परंतु पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर यांनी पत्र देताना आपली स्वाक्षरी करून आणि आपले पद देऊन मोकळे झाले असे दिसत आहे. यामुळे प्रथम अपील कोणाकडे सादर करायची हा प्रश्न सामान्य नागरिकासमोर उपस्थित होतो आहे.
माहिती अधिकारी तथा अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक चंद्रपूर यांनी दिलेल्या पत्रात प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचा उल्लेख आहे.
तसेच जनमाहिती अधिकारी तथा अप्पर कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय चंद्रपूर यांनी दिलेल्या पत्रात प्रथम अपिलीय अधिकार्याचा उल्लेख आहे.