Sunday, May 31, 2026
HomeParbhaniहजारो नागरिकांनी घेतला नगर भोजनाचा आस्वाद.
spot_img

हजारो नागरिकांनी घेतला नगर भोजनाचा आस्वाद.

हजारो नागरिकांनी घेतला नगर भोजनाचा आस्वाद.

रामनवमी निमित्त नगर भोजनाचे आयोजन : विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम.

ज्योत्स्ना वानखेडे: दि.26 श्रीराम नवमी निमित्त सेलू येथील माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या नगर भोजनाचा जवळपास 20 हजार महिला व नागरीकांनी आस्वाद घेतला. विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने 24 वर्षांपासून रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम, भजन, किर्तन, भागवत कथा, नगर भोजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या पावन पर्वा निमित्त हभप शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे किर्तन आयोजिले होते. अतिशय सुंदर अशा या कीर्तनाचा सर्व महिला भगिनींनी व पुरुष मंडळींनी मोठ्या भक्ती भावाने आस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री साई मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर आयोजित नगरभोजनास सेलू शहरातील सुमारे 20 हजार नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.सायंकाळी महा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे अतिशय सुंदर व नयनरम्य दृश्य या वेळी आरतीचे पाहायला मिळणार असून जवळपास 2 हजार महिला या महाआरती साठी उपस्थित राहणार असल्याचे सयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विरोद बोराडे मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page