Wednesday, May 6, 2026
HomePoliceबल्लारपूरमध्ये पोलिसांचा थरारक पाठलाग; देशी बनावटी पिस्तूलासह आरोपी अटक, मंदिरातील वादाशी संबंध...
spot_img

बल्लारपूरमध्ये पोलिसांचा थरारक पाठलाग; देशी बनावटी पिस्तूलासह आरोपी अटक, मंदिरातील वादाशी संबंध तपासात

बल्लारपूरमध्ये पोलिसांचा थरारक पाठलाग; देशी बनावटी पिस्तूलासह आरोपी अटक, मंदिरातील वादाशी संबंध तपासात

ज्योत्स्ना वानखेडे: शहरातील रविंद्रनगर परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटी अग्नीशस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी चित्रपटातील थरारक पाठलागानंतर अटक केली आहे.
         मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हद्दीत नियमित गस्त घालत असताना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानुसार, रविंद्रनगर वार्डातील उमाशंकर बरदानी निषाद (वय ४०) हा परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने देशी बनावटी पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे समजले.
       माहितीची शहानिशा करून पोलिसांनी तत्काळ रविंद्रनगर परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपीने कारवा रोडच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेगाने पाठलाग करून कारवा रोडवरील सार्वजनिक शौचालयाजवळ त्याला घेराव घालत ताब्यात घेतले.
       अंगझडतीदरम्यान आरोपीच्या कमरेमागे लपवून ठेवलेले ७.६५ एमएम बोरचे देशी बनावटी सिंगल बॅरल पिस्तूल अंदाजे किंमत २५ हजार रुपये व एक जिवंत काडतूस असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
       या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
       सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोउपनि अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, नापोअं सचिन अल्लेवार तसेच पोलीस अंमलदार लखन चव्हाण, खंडेराव माने, गुरू शिंदे, मिलिंद आत्राम, शरद कारूष व मपोअं अनिता नायडू यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page