Monday, May 25, 2026
HomeParbhaniमानवाला विचारांची दिशा देणे संत वाङ्म्याचे कार्य आहे.--चैतन्य महाराज देगलूकर
spot_img

मानवाला विचारांची दिशा देणे संत वाङ्म्याचे कार्य आहे.–चैतन्य महाराज देगलूकर

मानवाला विचारांची दिशा देणे संत वाङ्म्याचे कार्य आहे.–चैतन्य महाराज देगलूकर

ज्योत्स्ना वानखेडे: दि.03 मार्च मानव हा विचारांमध्ये अल्पविचार करतो.सकळ मानव जातीला व्यापक विचारांची गरज आहे.हे संतांनी हजारो वर्षांपूर्वी ओळखले आहे.त्यामुळे केवळ मोक्ष नाही तर सर्व मानव जातीला विचारांची योग्य दिशा देणं ही संत वाङ्म्याचे कार्य आहे असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. येथील वसंत प्रतिष्ठाण व खारकर परिवाराच्या वतीने आयोजित ‘ पसायदान ‘ या प्रवचन मालेचे दुसरे पुष्प त्यांनी आज दि 03 एप्रिल रोजी गुंफले.सर्व प्रथम वसंत प्रतिष्ठानचे महेश खारकर व ऍड.उमेश खारकर यांनी संत पूजन केले.यावेळी अभंग गायन यशवंत चारठाणकर,तबला गिरीश दीक्षित,हार्मोनियम शंतनू पाठक तर टाळ साथ प्रकाश सुरवसे यांनी दिली.पुढे बोलतांना श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की,केवळ दुःख निवृत्त म्हणजे सुख असू शकत नाही.मानवाच्या सुखाच्या व्याप्ती वेगवेगळ्या आहेत.परंतु संतांच्या सुखाची व्याप्ती खूप व्यापक आहे.म्हणून संतांनी सुखाची व्याप्ती पसायदानातून सांगितली आहे.संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदानातून सकळ मानव जातीच्या कल्याणासाठी पसायदानातून मागणी केली आहे.पसायदानात ‘ किंबहुना ‘ या शब्दात खूप व्यापक अर्थ रुजलेला आहे.अनेक अनुल्लेखित मागण्यांचा विचार संत ज्ञानेश्वरांनी केला आहे.मानवाची जीवनातील प्रत्येक कृती ही शेवटी सुखाकडे जाता यावे म्हणून असते.त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ‘ सर्व सुखी ‘ या शब्दात मानवाच्या सर्वच सुखांसाठी प्रार्थना पसायदानात केली आहे.प्रवचनाच्या शेवटी सामूहिक पसायदान झाले. शरण्या मोहकरे,मनवा देशमुख,आरोही ओगले,यथार्थ गौलवाड आदींनी पसायदान गायले.प्रवचनाचे सूत्रसंचालन ह.भ.प.संजय पिंपळगावकर यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page