गटकळ अकॅडमी सेलू ची कु.स्वाती बाबासाहेब खंदारे यांची परभणी पोलीस पदी निवड.

ज्योत्स्ना वानखेडे: नुकत्याच लागलेल्या निकालांमध्ये गटकळ करिअर अकॅडमी ची विद्यार्थिनी कु.स्वाती बाबासाहेब खंदारे (रा. हातनूर तालुका सेलू जिल्हा परभणी) यांची परभणी पोलीस पदी(परभणी जिल्हा महीलांमधून प्रथम) निवड झाली. याबद्दल तिचा आई वडिलांसह अकॅडमी तर्फे व समस्त गावकरी तर्फे वाजत गाजत मिरणुक काढून, जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार करण्यात आला. या वेळी तिच्या सोबतच अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन पालघर पोलीस पदी निवड झालेली ममता थोरात,मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झालेली मोनाली जमधाडे आणि सुरेखा चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चारही मैत्रिणीने एकाच वेळी हे यश संपादन केल्यामुळे सेलू तालुक्यातील सर्व स्तरातून तिचे व गटकळ अकॅडमीचे कौतुक होत आहे.या सत्कार सोहळा निमित्त अकॅडमीचे संचालक प्रा. रामेश्वर गटकळ सर, प्रा. दीपक गटकळ सर, गोपाळ ताठे,मैदानी प्रशिक्षक योगेश राठोड, हातनुर गावचे सरपंच महेन्द्र गाडे, गोहेगावचे माजी सरपंच दत्तापाटील गटकळ, पोलीस पाटील बबन पारवे, जयसिंग शेळके तसेच युवा नेते शुभम खंदारे, सर्व परिवार, अकॅडमीतील सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिद्द, चिकाटी, मेहनत व त्याचबरोबर सातत्य टिकून ठेवलं तर तुम्ही यशाला नक्कीच गवसणी घालू शकता असं आपले मनोगत व्यक्त करताना स्वाती यांनी सांगितले.








