Saturday, April 18, 2026
HomeParbhaniसेलूमध्ये गोवंश तस्करी करणारे आठ वाहने जप्त.
spot_img

सेलूमध्ये गोवंश तस्करी करणारे आठ वाहने जप्त.

सेलूमध्ये गोवंश तस्करी करणारे आठ वाहने जप्त.

45 जनावरे जप्त, आरोपींवर गुन्हे दाखल.

ज्योत्स्ना वानखेडे: दि.17 सेलू शहरातील रायगड कॉर्नर परिसरात पहाटेच्या सुमारास अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणार्‍या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित चालक व आरोपींविरोधात सेलू पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मिळालेल्या माहिती नुसार, पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान सात पिकअप व एक आयशर अशा एकूण आठ वाहनांमधून गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रायगड कॉर्नर येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे 45 बैल जातीची गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत व जप्त केलेल्या वाहनांसह एकूण सुमारे 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही जनावरे पारडगाव (ता. परतूर) येथून कोंबून, त्यांना यातना होईल अशा अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यामुळे मोटार वाहन कायदा व प्राणी संरक्षण संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्याने गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली सर्व गोवंश जनावरे इटोली (ता. जिंतूर) येथील गोशाळेत हलविण्यात आली आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हवालदार जाधव, तेलंगे, कोपनर, रासकटला, साठे यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार तेलंगे, शेख व राठोड करीत आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page