१२ तासांत बंद दुकानफोडीचा गुन्हा उघड : तीन आरोपी जेरबंद, चोरीचा मुद्देमाल जप्त
ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत बंद दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवली.
सीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी १२ तासांच्या आत तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.