Tuesday, August 18, 2026
spot_img
Homeबल्लारपूरश्री मंगेश अशोक रेगुंडवार यांना महाराष्ट्र साई "पद्मश्री पुरस्कार".

श्री मंगेश अशोक रेगुंडवार यांना महाराष्ट्र साई “पद्मश्री पुरस्कार”.

श्री मंगेश अशोक रेगुंडवार यांना महाराष्ट्र साई *पद्मश्री पुरस्कार*

ज्योत्स्ना वानखेडे:
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत *राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई “पद्मश्री पुरस्कार”* हा दिनांक 2 मे 2026 रोज शनिवार.परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल न्यु रिंग रोड सिटी मार्केट  शेजारी शिर्डी येथे अतिशय धुमधडाक्यात व निसर्गाच्या सान्निध्यातील प्रसन्न वातावरणात संपन्न झाला  या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  एकूण 275 मान्यवरांना हा साई च्या नावाने दिला जाणारा व साई च्याच पदस्पर्शाने या पावन भुमित (शिर्डीत) हा अतिशय मानाचा,सन्मानाचा,प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा असा हा राष्ट्रीय पातळी वरील पुरस्कार प्रमुख अतीथिंच्या हस्ते  वितरण करण्यात आला.मंगेश रेगुंडवार यांना त्यांच्या सामाजिक, राजकीय, कामगार, पत्रकारिता,तसेच चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक पुरस्कार सहकुटुंबसह देण्यात आला या पुरस्कार सोहळ्यास राज्यातील सुमारे 1000 ते1200.लोकांची  उपस्थिती होती तसेच या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास नामवंत समाज सेवक ,प्रसिद्ध उद्योजक, शिक्षण तज्ञ, कृषीविषयक क्षेत्रातील तज्ञ व सिनेमा सृष्टीतील सेलिब्रिटीज च्या शुभ हस्ते व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.विशेष करून या पुरस्कार सोहळ्याची *लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड* मध्ये सुद्धा नोंद झाली आहे,श्री रेगुंडवार यांनी आयोजक श्री सुदाम जी संसारे  तसेच संपूर्ण चमू चे आभार व्यक्त केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page