Friday, June 5, 2026
HomeNagbhid*भूमी अभिलेख कार्यालय येथील भुकर मापक श्री. रंजीत रामचंद्र कनोजकर व एका...
spot_img

*भूमी अभिलेख कार्यालय येथील भुकर मापक श्री. रंजीत रामचंद्र कनोजकर व एका खाजगी इसमाविरुद्ध अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूरची कारवाई*

*भूमी अभिलेख कार्यालय येथील भुकर मापक श्री. रंजीत रामचंद्र कनोजकर व एका खाजगी इसमाविरुद्ध अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूरची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे* 

भूमी अभिलेख कार्यालय, नागभिड, जि. चंद्रपूर येथील परिरक्षण भुकर मापक श्री. रंजित रामचंद्र कनोजकर यांनी एका खाजगी इसमामार्फत तक्रारदाराचे आजोबांच्या नावाने असलेल्या घराच्या जागेची वडिलांच्या नावाने फेरफार करण्याच्या कामाकरिता लाच रक्कम मागणी करून स्वीकारल्याने अँटी करप्शन ब्युरो, चंद्रपूर यांच्या पथकाने आज दि. 05/06/2026 रोजी कारवाई केली.

यातील तक्रारदार हे त्यांच्या परिवारासह राहत असलेल्या घराची जागा ही त्यांचे आजोबांच्या नावाने असून आजोबा मरण पावले असल्याने त्या जागेवर वडिलांच्या नावाने फेरफार करण्याकरिता उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, नागभिड येथे जाऊन तेथील परिरक्षण भुकर मापक श्री. रंजित रामचंद्र कनोजकर यांना भेटून अर्ज दिला होता. त्यावेळी श्री. रंजित कनोजकर यांनी तक्रारदार यांना त्यांचे वडिलांच्या नावाने फेरफार घेण्याकरिता 15 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना आरोपी श्री. रंजित कनोजकर, परिरक्षण भुकर मापक, कार्यालय उपअधीक्षक, भूमी अभिलेख, नागभिड यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. 04/06/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष हजर येऊन तक्रार दिली.

तक्रारदार यांचे प्राप्त तक्रारीवरून दि. 04/06/2026 रोजी आरोपी श्री. रंजित कनोजकर, परिरक्षण भुकर मापक, कार्यालय उपअधीक्षक, भूमी अभिलेख, नागभिड यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांचे आजोबांच्या नावाने असलेल्या घराच्या जागेवर वडिलांच्या नावाने फेरफार करण्याच्या कामाकरिता तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

त्यावरून आज दि. 05/06/2026 रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांनी आरोपी श्री. रंजित कनोजकर, परिरक्षण भुकर मापक, कार्यालय उपअधीक्षक, भूमी अभिलेख, नागभिड यांना फोन केला असता त्यांनी खाजगी इसम जयंत दिपक कामडी, रा. तळोधी यांच्याकडे लाच रक्कम देण्यास सांगितले. त्यावरून तक्रारदार यांनी आरोपी जयंत कामडी यांच्याकडे 10 हजार रुपये दिले असता त्यांनी ती लाच रक्कम स्वीकारल्याने त्यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले. तसेच आरोपी श्री. रंजित रामचंद्र कनोजकर, परिरक्षण भुकर मापक, कार्यालय उपअधीक्षक, भूमी अभिलेख, नागभिड यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपासकार्य सुरू आहे.

सदरची कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात श्री अनिल  जीटटावार, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार व सापळा पथक पोहवा रविकुमार इंगळे, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, सचिन गजभिये, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, चापोशि/सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चापोशि/संदिप कोरासे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर*

श्री अनिल जीटटावार, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर :- 9823270581

श्री. सचिन धर्मेजवार, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर :- 9623055655

Toll Free No. 1064

Phone No.: 07172-250251

Mob. No. 8379951064

Email: acbchandrapur@gmail.com

Website: http://www.acbmaharashtra.gov.in

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page