बल्लारपुर प्रभाग क्र. १० मध्ये नागरिकांना दिलेले पुन्हा एक आश्वासन पूर्ण; पाणी समस्येवर उपाय म्हणून दोन ठिकाणी बोअरवेलचे काम सुरू…!
*ज्योत्स्ना वानखेडे*:
प्रभाग क्र. १० मधील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत आज पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रभागात धनलक्ष्मी किराणा स्टोर आणि भेंडेचे घरामागील फॉरेस्ट लगतचे परिसरातील या दोन ठिकाणी बोअरवेल (बोरिंग) खोदण्याचे काम करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ही महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली आहे. या कामामुळे प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पाणी समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, प्रतिष्ठित चिकित्सक डॉ. अनिल वाढई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, नगरसेवक सुमित (गोलू) डोहणे,नगरसेविका प्रतिनिधी शाहिद शेख तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
बोअरवेलच्या कामामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या जनहिताच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.