*पोलीस स्टेशन कोरपना यांची धडक कारवाई – 2 नग बैल गोवंशीय जनावरांची सुटका. पिकअप वाहनासह मुद्देमाल जप्त*
*ज्योत्स्ना वानखेडे*
पोलीस स्टेशन कोरपना हद्दीत *दि. 24/07/2026 रोजी रात्री 21:00 वा.* दरम्यान खाजगी वाहनाने पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मौजा पारडी येथील नागरिकांनी माहिती दिली की,
*पिकअप वाहन क्र. MH.34 BG.6146* पारडी येथून खूप वेगाने जात आहे व त्यामध्ये 2 गोवंश आहेत.
आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचून पिकअप वाहन चालकास विचारपूस केली असता चालकाने आपले नाव *दिनेश पांडुरंग बोरडे, रा. कोडशी* असे सांगितले.
2 नग बैल गोवंशाबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणतीही पावती किंवा गाडीचे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे सांगितले.
सदर 2 नग बैल गोवंश *बेला येथे कत्तल करीता* नेत असल्याचे त्याने सांगितले.
करीता सदर वाहनात *2 नग बैल गोवंश* मिळून आल्याने याबत पंचनामा करून *वाहनासह 2 नग बैल गोवंश ताब्यात* घेण्यात आले.
*जप्त मुद्देमालाची किंमत:*
1. *2 नग बैल गोवंश* – अंदाजे किंमत रु. 20,000/-
2. *पिकअप वाहन* – किंमत रु. 2,00,000/-
*एकूण जप्त मुद्देमाल:* रु. 2,20,000/-
*गुन्हा दाखल:*
याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध *महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(अ)(1), 5(ब), 11(1)(ड) सहकलम 185 मोटार वाहन कायदा* अन्वये पोलीस स्टेशन कोरपना येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
*पोलिसांचे म्हणणे:*
पोलीस स्टेशन कोरपना यांच्याकडून करण्यात आलेल्या या तत्पर कारवाईमुळे गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात यश आले असून अवैध जनावर वाहतुकीवर आळा घालण्यात आला आहे.
*ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, सा. चंद्रपूर मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, सा. चंद्रपूर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रवींद्र जाधव, सा. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक *लता वाडीवे*, पो.अं. *सटवा नामपल्ले* ब.नं. 554, पो.अं. *विशाल मोरे* ब.नं. 1656, पो.अं. *लक्ष्मण नुनूंचे* ब.नं. 1668 यांनी केली.