Thursday, August 6, 2026
spot_img
HomeCrime*मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस पोलीस...

*मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस पोलीस ठाणे रामनगर नी केले जेरबंद*

*मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारे गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस पोलीस ठाणे रामनगर नी केले जेरबंद*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
*प्रकरणाची हकीकत:*
दि. *03/08/2026* रोजी सरतर्फे फिर्यादी *पोउपनि कृष्णा दराडे, पोहवा आनंद खरात/1165, पोहवा संतोष जोरगलवार/2136* हे पोस्टेला दैनंदिन कामकाज करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, *यासीर अली उर्फ सैय्यद परवेज सैय्यद गणी, वय 35 वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. बगड खिडकी मदरसा जवळ, चंद्रपूर* हा त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करीत असल्याचे समजले.
*पोलिसांची कारवाई:*
मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या स्टाफने व पंचांसह नमुद आरोपीच्या घरी छापा टाकला. झडतीमध्ये त्याच्या घरातून *16.025 किलो ग्रॅम गांजा* मिळून आला.
चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की हा गांजा त्याचा साला *जुबेर करीम खान, रा. बगड खिडकी, चंद्रपूर* याने आणून दिला होता. तसेच *कालू, रा. बगड खिडकी, चंद्रपूर* याच्याकडे वजन काटा होता.
*जप्त करण्यात आलेला मुद्देमाल – एकूण किंमत ₹1,60,100/-*
1.  *कॅनबिस/गांजा* – निव्वळ वजन 15.860 किलो ग्रॅम, किंमत ₹1,58,600/-  _प्रति किलो ₹10,000/- प्रमाणे_
2.  *KiloMaxx कंपनीचा इलेक्ट्रिक वजन काटा* – किंमत ₹1500/-
3.  *2 प्रवासी बॅग + 08 अर्धवट कापले रिकामे चिकटपट्ट्याचे पॅकेट* – किंमत ₹0/-
सदर मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला.
*गुन्हा नोंद:*
याप्रकरणी पोलीस ठाणे रामनगर येथे *अपराध क्र. 980/2026 कलम 8(क), 20(b)(ii)(b), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट* अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
*कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी:*
ही कारवाई *मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद चौगुले* यांच्या मार्गदर्शनात, *पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम* यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.
*पथक:* सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि. कृष्णा दराडे, पोहवा प्रकाश बल्की, पोहवा जितेंद्र आकरे, पोहवा बाबा नैताम, पोहवा रवि ढेंगळे, पोहवा रामप्रसाद नैताम, पोहवा आनंद खरात, पोअं प्रकाश मडावी, पोअं पंकज ठोबरे, मपोहवा मनिषा मोरे, पोअं देविदास राठोड, मपोअं सुरेश कोरवार, पोअं सुरज शेडमाके, महिला पोलीस अ. ब्लूटी साखरे यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page