*Jyotsna Wankhede*: लोककल्याण, न्यायप्रिय प्रशासन आणि समाजहितासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. जनतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ निर्माण केला. त्यांच्या विचार आणि कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पर्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, महामंत्री रविंद्र गुरुनुले, मनोल पाल, सविता दंढारे, भाजन नेते प्रकाश देवतळे, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, वंदना हातगावकर, तुषार सोम, बलराम डोडाणी, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, अजय जयसवाल, मंडळ अध्यक्ष प्रदिप किरमे, सुभाष अदमाने, दिवाकर पुडट्टवार, प्रविण गिलबिले, राकेश बोमावार नगर सेवक सविता कांबळे,, आशा देशमूख, पुष्पा उराडे, अॅड सारिका संदुरकर, ज्योती जिवणे, नगरसेवक भालचंद्र दानव, नितेश गवळी, जितेश कुळमेथे, वर्षा चिडे, कौसर खान, नीलिमा वनकर, छाया चवरे आदिंची उपस्थिती होती
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून महिला नेतृत्वाची ताकद आणि प्रशासनातील कर्तृत्व संपूर्ण देशासमोर सिद्ध केले. प्रजेच्या सुख-दुःखाला आपले सुख-दुःख मानून त्यांनी लोककल्याणकारी निर्णय घेतले. मंदिरांचा जीर्णोद्धार, धर्मशाळा, विहिरी, घाट आणि रस्त्यांची निर्मिती अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य केले.
अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे त्याग, सेवा, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करून त्यांनी केलेले कार्य आजच्या लोकप्रतिनिधींसाठीही आदर्श आहे. असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण केले.