अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर गोंडपिपरी पोलिसांची कारवाई
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक 14/08/2026 रोजी गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार डी.ओ. ड्युटीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजा वढोली गावातील ग्रामपंचायत समोर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक व पंच घटनास्थळी गेले असता लाल रंगाचा महिंद्रा YUVO TECH+ 575 DI ट्रॅक्टर क्र. MH-34-BT-3036 व त्यास जोडलेली ट्रॉली क्र. MH-34-CB-9983 यामध्ये रेती भरलेली आढळून आली.
ट्रॅक्टर चालकाचे नाव गुरुदास सुंदरशा मडावी, वय 36 वर्षे, रा. फुर्डहिटी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर असे असून, चौकशीदरम्यान सदर रेती मौजा तारडा नदी घाटातून भरून मौजा वढोली येथे टाकण्यासाठी आणल्याचे त्याने सांगितले.
सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे 01 ब्रास रेती, अंदाजे किंमत ₹10,000/-, तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीची अंदाजे किंमत ₹5,00,000/-, असा एकूण अंदाजे ₹5,10,000/- किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आली.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक गुरुदास सुंदरशा मडावी तसेच ट्रॅक्टर मालक मंगेश सुधाकर लखमापुरे, रा. तारडा, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांच्या वतीने करण्यात आली असून, अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपअधीक्षक सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे,Gpsi वसंत कोसमशिले ,HC मुनेश्वर रात्रे पोलीस अंमलदार अतुल तोडासे,तिरुपती गोडसेलवर,प्रविण कडूकर,यांनी केली आहे.