Monday, August 17, 2026
spot_img
HomeKorpana*गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या आईचर वाहनासह 18,00000 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त :पोलीस...

*गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या आईचर वाहनासह 18,00000 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त :पोलीस स्टेशन कोरपणाची कारवाई*

*गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या आईचर वाहनासह 18,00000 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त :पोलीस स्टेशन कोरपणाची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
कोरपणा पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 16 ऑगस्ट २०२६ रोजी कोरपणा पो. स्टे.परिसरात नाकाबंदी तोडून पळून गेलेल्या वाहणाचा पाठलाग करून गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आईचर  वाहन क्रमांक MH 34 BG 9203 वर कारवाई केली.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मौजा मेहंदी फाट्या जवळ नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान गडचांदूर मार्गे येणारे सदर आईचर  वाहन संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांनी वाहन थांबविण्यास इशारा केला असता बरिकेट्स तोडून नमूद वाहन पळून गेले. त्याचा पाठलाग करून वाहन थांबविले असता वाहन चालक वाहन चालू स्थितीत ठेवून पळून गेला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 20 गोवंशीय जनावरे आढळून आली.गोवंश वाहनामध्ये दाटीवाटीने निर्दयीतेने  तोंड पाय बांधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करित असताना आढळून आले.
या कारवाईमध्ये
* 20 नग लाल पांढऱ्या रंगाचे गोवंश बैल — अंदाजे किंमत ₹ 300000/-
* आईचर वाहन क्रमांक MH 34 BG 9203— अंदाजे किंमत ₹15,00000/-
असा एकूण ₹ 18,00000 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आईचर वाहन क्र MH34/BG 9302 च्या फरार चालक आरोपी विरुद्ध कलम – 5(अ ), 5(ब ),6,9,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2015 सहकलम 11(1)(ड ) प्राण्यांला निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० मोटर वाहन अधी. 1988 कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांना पुढील वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित ठिकाणी देखभालीसाठी ठेवण्यात आले आहे.
गोवंशाची अवैध वाहतूक व पशूंच्या छळाविरुद्ध कायदेशीर कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार लता वाढीवे ,पो हवा अमर राठोड 2455, पो अं. दिपक नागतुरे/1134,  विशाल मोरे, अजय निखाळे, पुंडलिक फड, विद्या गुंडाले यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page