Saturday, August 29, 2026
spot_img
HomeBhamahpuri*सराईत गुन्हेगारांना हद्दपारीचा दणका, ब्रम्हपुरी पो.स्टे हद्दीतील 4 सराईत गुन्हेगार यांना तडीपरीचा...

*सराईत गुन्हेगारांना हद्दपारीचा दणका, ब्रम्हपुरी पो.स्टे हद्दीतील 4 सराईत गुन्हेगार यांना तडीपरीचा आदेश*

*सराईत गुन्हेगारांना हद्दपारीचा दणका, ब्रम्हपुरी पो.स्टे हद्दीतील 4 सराईत गुन्हेगार यांना तडीपरीचा आदेश*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे 1. संजय मधुकर लांजेवार,वय-52 वर्षे,रा.फुलेनगर ब्रम्हपुरी,2. सुरज नामदेव बगमारे,वय-37 वर्षे,रा.बोंडेगाव हुळकी ब्रम्हपुरी,3. कमलसिंग मायासिंग जुनी,वय-25 वर्षे,रा.मेंडकी ता.ब्रम्हपुरी, 4. वैभव उर्फ गोलु नानाजी राउत,वय-30 वर्षे,रा.गणेशपुर ता. ब्रम्हपूरी यांचे विरुद्ध अवैध दारू विक्रीचे व जुगाराचे मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल असून, त्यांचेविरुद्ध यापूर्वी वारंवार कार्यवाही करून प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून देखील त्यांचे वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. वरील चारही इसम हे गुन्हेगारी पार्श्वभुमी वरील असुन त्याच्यामुळे गावात अशांतता निर्माण होत असल्याबाबत वारंवार तक्रारी ब्रम्हपूरी पोलिस स्टेशन ला प्राप्त होत्या. सदर अवैध दारू विक्रेते व सटटापटटीचा जुगार खेळणाऱ्या याचे वर्तनात कोणतीही सुधारणा न होता ते अवैधरित्या दारू विक्री व सटटापटटीचा जुगार खेळणाऱ्या होते. ज्यामुळे संपूर्ण गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते व सर्वसाधारण लोक त्यांना घाबरून राहत होते.

वरील चारही इसमाचे अशाप्रकारचे वागण्यामुळे सर्वसाधारण माणसामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे सदर सराईत गुन्हेगार यांना हद्दपार करणे असल्याने, सदर गुन्हेगार याचेविरुद्ध दाखल असलेल्या अपराधाबाबत पुरावे गोळा करून, मा. पोलिस अधिक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अप्पर पोलिस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. साहील झरकर, पोलिस निरिक्षक श्री प्रमोद बानबले यांचे मार्गदर्शनात, सपोनिरि मनोज खडसे सोबत पोहवा मुकेश गजबे, मिलिंद नैताम, पोलिस अंमलदार प्रविन भिवगडे, इरशाद खान, निलेश तूमसरे, स्वप्नील पळसपगार व वशिष्ठ रंगारी यांनी सदर अवैध दारू विक्रेते यास हद्दपार करणेसाठी, त्याचे विरुद्ध दाखल गुन्ह्याचे कागदपत्रे प्राप्त करून हद्दपार प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, ब्रम्हपूरी, यांचेकडे पाठविण्यात आला.

सदर प्रकरणामध्ये संपूर्ण कायदेशीर कार्यवाही झाले नंतर मा.उपविभागीय दंडाधिकारी, ब्रम्हपूरी यांनी दिनांक १९/०८/२०२६ रोजी सदर 1. संजय मधुकर लांजेवार,वय-52 वर्षे,रा.फुलेनगर ब्रम्हपुरी,2. सुरज नामदेव बगमारे,वय-37 वर्षे,रा.बोंडेगाव हुळकी ब्रम्हपुरी,3. कमलसिंग मायासिंग जुनी,वय-25 वर्षे,रा.मेंडकी ता.ब्रम्हपुरी, 4. वैभव उर्फ गोलु नानाजी राउत,वय-30 वर्षे,रा.गणेशपुर ता. ब्रम्हपूरी यांना पुढील ०९ महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याचे क्षेत्रामधून हद्दपार करण्याचा आदेश पारीत केला. सदर चारही अवैध दारू विक्रेत्यास व सटटापटटीचा जुगार खेळणाऱ्यास शोधपथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेवून त्यांना चंद्रपूर जिल्ह्यामधून घालवून दिले आहे.

सदर अवैध दारू विक्रेत्यास व सटटापटटीचा जुगार खेळणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामधूनच तडीपार केल्यामुळे ब्रम्हपुरी येथील सर्वसाधारण लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक लोकांनी अवैध दारू विक्रेत्यास हद्दपार करण्यासाठी पोलिस विभागामार्फतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page