Thursday, September 3, 2026
spot_img
HomePolice*आंतरराज्यीय आरोपीसह ०३ पुरुष आरोपीकडून १७.४७५ किलो गांजा, चारचाकी वाहन व वापरते...

*आंतरराज्यीय आरोपीसह ०३ पुरुष आरोपीकडून १७.४७५ किलो गांजा, चारचाकी वाहन व वापरते ०४ मोबाईलसह एकुण १७,०८,७५०/- रू माल जप्त* *स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कार्यवाही*

*आंतरराज्यीय आरोपीसह ०३ पुरुष आरोपीकडून १७.४७५ किलो गांजा, चारचाकी वाहन व वापरते ०४ मोबाईलसह एकुण १७,०८,७५०/- रू माल जप्त* *स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. ०२/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम हे ओरीसा येथून गांजा घेवून चारचाकी वाहनाने येणार आहे. सदर गांजा विक्रीकरीता घेवून जाणार आहेत, अशा माहितीवरून बल्लारपुर राजुरा मार्गावर बामणी चौक येथे सापळा रचून आरोपी नामे अमोल रमेश कांबळे, वय ३३ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. एरंडी सरोडा, ता. औसा जि. लातूर. २) सदानंद रविंद्र जना, वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. साबोरीया, ता. खलीगोट जि. गंजम राज्य ओडीसा ३) ओंगा विरा कोवासी, वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बोपनपल्ली ता. कालीमेला, जि. मलकनगिरी राज्य ओडीशा यांचेसह चारचाकी क्रमांक एमएच-२४ बीआर-९२८२ पकडला असता त्यांचेकडे १७.४७५ किलो गांजा अवैध वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने आरोपीकडून वापरते मोबाईल -०४, गांजा सदृश्य वनस्पती १७.४७५ किलो व चारचाकी वाहन असा एकुण १७,०८,७५०/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे. करीता आरोपीविरूध्द गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये पोलीस स्टेशन बल्लारशा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन बल्लारशा करीत आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री.आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.श्री.ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री.अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतृवात सपोनि दिपक काँक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पोहवा गणेश भोयर, पोहवा रामराव बिंगेवाड, पोहवा शरद कुडे, पोहवा रजनीकांत पुठठावार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुभाष गोहोकार, पोअं प्रतिक हेमके, पोअं विठठल काकडे, पोअं/ प्रफुल पुप्पलवार, पोशी/दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page