*लोकसभा अधिवेशन दरम्यान दिल्लीत होणार ओबीसी गुंज; हैदराबाद येथे नियोजन बैठक संपन्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*: भारत सरकारने राजपत्राच्या प्रश्नावली मध्ये ओबीसी साठी स्वतंत्र्य कॉलम ची सूची नसल्याने,२०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या नियोजन बैठक हॉटेल टुरिझम प्लाझा हैदराबाद येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजुला गौड, महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली, यावेळी तेलंगणा राज्याचे ओबीसी मंत्री पूनम प्रभाकर गौड, खासदार सुरेश शेखर, प्रमुख सल्लागार माजी खासदार हनुमंतराव, आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
ओबीसी मंत्री पूनम प्रभाकर गौड बोलताना मनाले की तेलंगणा राज्य सरकारने ज्या प्रकारे ओबीसी जातीची यादी देऊन सर्वे केला त्या पद्धतीने 2027 ची जनगणना करावी असे बोलले, गॅजेट च्या प्रश्नावली ओबीसींचा कॉलम नसेल तर जनगणना करून काहीही फायदा होणार नाही असेही म्हणाले, महासचिव सचिन राजुरकर यांनी रामलीला मैदानावर आंदोलनाची रूपरेषा कशी असेल त्यावर मार्गदर्शन केले,अध्यक्षीय भाषणात बबनराव तायवाडे म्हणाले की जो पर्यंत ओबीसी समाज आपल्या हक्का साठी रस्त्यावर उतरणार नाही तो पर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही असे बोलत होते.
तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उत्तर प्रदेशचे तरूण पटेल, छत्तीसगडचे संतोष कुमार गुप्ता, कर्नाटकचे लक्ष्मण यादव, राज्य मागासवर्गीय आयोगाने माजी सदस्य इकबाल अन्सारी, प्रकाश साबळे, सुभाष घाटे,शरद वानखेडे, गुणेश्वर आरिकर, संजय ढवस शकील पटेल, बबन नाखले , भैय्या लडके, शेंडे सर,राहुल तायडे,मुकेश पुडके, रवी झाडे,राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा रत्नमाला पिसे, रायपूरच्या पार्वती शाहू, रेखा शाहू आंध्रप्रदेश बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष केसांना शंकरअण्णा , प्रो. पी एल. विश्वासराव, प्राफेसर व्यंकटरमण, प्रोफेसर व्यंकटेश्वरम क्रांती गौड, तेलंगणा बिसी वेल्फेअर असोसिएशनचे के श्रीनिवास मुद्रास, विक्रम गौड, शाम कुर्मा मनी मंजिरी गणेश चारी प्रोफेसर मलेश्वरम आणि , गोवा, दिल्ली, महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.