*25 वी आय.एस.के.एफ राष्ट्रीय कराटे प्रतियोगिता व ऑल इंडिया शोतो कप चे आयोजन*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि 01/10/2026 ते 04/10/2026 ला हरिद्वार,उत्तराखंड गुरूमंडल आश्रम मायापुरी येथे 25 वी आय.एस.के.एफ राष्ट्रीय कराटे प्रतियोगिता व ऑल इंडिया शोतो कप चे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये बिहार, अरुणाचल प्रदेश,आसाम, महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,हरियाणा, पंजाब,उत्तराखंड,दिल्ली या राज्यानी या प्रतियोगितेत सहभाग घेतला.
या प्रतियोगितेचे मुख्य आयोजक इंटरनेशनल शोतोकान कराटे फेडरेशन ऑफ इंडिया चे फाऊंडर शिहान शिव के. पांचाल यांचे द्वारा संपुर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आले. चार दिवसाच्या कार्यक्रमा मध्ये प्रथम दोन दिवस कराटे प्रशिक्षण, तिसऱ्या व चौथ्या दिवशी कराटे प्रतियोगिता घेण्यात आली या प्रतियोगिते चे मुख्य अतिथि म्हणुन उदघाटन करिता जापान चे ग्रांड मास्टर मासाहिरो मोतोमुरा 10 th Dan Black Belt व शिहान दाईताका मिझुतानी 7 th Dan Black Belt हयांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा च्या अंती मुख्य अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सोबतच सेंसेई सतिशबाबु अग्रवाल 2nd Dan International सेन्साई विकास सुधाकर देशभ्रतार, कुमारी. तृषा संजय खोब्रागडे, रोहीत कुमार राजभर हयांना 1st Dan International ब्लॅक बेल्ट परिक्षा मध्ये उत्तीर्ण केल्या बददल प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करुन त्यांचे सत्कार करण्यात आले.
या प्रतियोगिते मध्ये 300 पेक्षा अधिक खेडाळुनी भाग घेतले तसेच बाहेरुन आलेल्या राज्या मध्ये हरियाणा राज्य यांना प्रथम पुरस्कार, बिहार यांना द्वितिय स्थान व महाराष्ट्र् यांनी तृतिय स्थान घेऊन प्रतियोगीते मध्ये आपले स्थान कायम केले.
*कुमिते मध्ये सुवर्ण पदक*.8 वर्षे -20 वजन मुली कु.शौर्या अजय खोब्रागडे, 12 वर्षे -40 वजन मुली कु. गार्गी सुमित आमटे ,13 वर्षे -60 वजन मुली कु. चेरिता राजकुमार जुटटु ,13 वर्षे मुलि -40 वजन कु. वैष्णवी कालिदास पेंदोर,कैडेट मुली -70 वजन कु.तमन्ना परवेज पठान, 12 वर्षे -50 वजन मुले मित प्रेमदास फर्डे,सिनियर पुरुष -67 वजन शिशिर बिपेंद्र प्रसाद, सिनियर पुरुष -75 वजन सतिशबाबु मुरारीलाल अग्रवाल.
*कुमिते मध्ये रजत पदक*. 10 वर्षे -25 वजन मुले रुद्रा राकेश कोंडागुर्ला, 10 वर्षे +40 वजन मुले हार्दिक कवि खोब्रागडे ,10 वर्षे -35 वजन मुले मन प्रेमदास फर्डे , जुनियर मुले -45 वजन प्रेमकुमार प्रदिप लिडबे,सिनियर मुले -55 वजन विवेक रविंद्रचारी अनासुरी,सिनियर मुले -60 वजन चैतन्य संजिव कुबडे, (कैडेट मुली) -40 वजन कु. मानवी बबन ताडसे, (जुनियर मुली) -45 वजन कु. तृषा संजय खोब्रागडे, कैडेट मुली -35 वजन कु. दिशा संतोष नवसागरे.
*कुमिते मध्ये कास्य पदक*
12 वर्षे -45 वजन मुले आरुष बालाजी चौधरी , (कैडेट मुले) -63 वजन मुले परशुराम कालीदास पेंदोर,(कैडेट मुली) दिशा संतोष नवसागरे,(कैडेट मुले) -40 वजन प्रणय पांडुरंग ताडसे , (कैडेट मुले) 40 वजन वेदांत प्रमोद नागतुरे, (सिनियर मुले) -67 वजन रोहीत कुमार राजभर, (कैडेट मुली) कु. तृषा संजय खोब्रागडे.
*काता मध्ये रजत पदक*. 8 वर्षे मुली कु.शौर्या अजय खोब्रागडे , 10 मुले मन प्रेमदास फर्डे,12 वर्षे मुले आरुष बालाजी चौधरी , 12 मुले मित प्रेमदास फर्डे 13 वर्षे मुले वेदांत प्रमोद नागतुरे, कैडेट मुले परशुराम कालीदास पेंदोर, 12 वर्षे मुली कु. गार्गी सुमित आमटे.
*कास्य पदक*.10 वर्षे मुले रुद्रा राकेश कोंडागुर्ला, 12 वर्षे मुले साहील संजय खोब्रागडे, जुनियर मुले प्रेमकुमार प्रदिप लिडबे, 13 वर्षे मुलि कु. वैष्णवी कालिदास पेंदोर जुनियर मुली कु. तृषा संजय खोब्रागडे. कु. उन्नती राकेश कोंडागुर्ला, कु.सिया अजय खोब्रागडे,अनमिश संजय पारधी, विष्णु विश्वकर्मा कराटे प्रतियोगिता मधे भाग घेतले शौर्य कराटे क्लब चे प्रशिक्षक शिहान संजीव कुबडे अध्यक्ष आय. इस. के. एफ. इंडिया, से.अजय व. खोब्रागडे उपाध्यक्ष,से.विकास देशभ्रतार अध्यक्ष आय. इस. के. एफ. महाराष्ट्र,से.संजय पारधी सचिव,कुणाल कुबड़े कोषाध्यक्ष,अग्रवाल फिटनेस क्लब चन्द्रपुर चे संचालक से.सतीशबाबु अग्रवाल यांचे द्वारा मुलांना नियमित प्रशिक्षण देण्यात येतात. तसेच पालकांनी विजयी प्राप्त केलेल्या मुलांचे कौतुक केले व सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृदं यानी मुलांना शुभेच्छा दिल्या. बल्लारपुर स्टेशन वर मा. एड. रणंजय सिंह अध्यक्ष भा. ज. पा. बल्लारपुर शहर,राकेश वड्सकर अध्यक्ष कुनबी समाज, ओमप्रकाश प्रसाद सामाजिक कार्यकर्ता, सुरेंद्र खड़का सामाजिक कार्यकर्ता महेश निषाद शहर सचिव बी. इस. पी ,एड. सुमित आमटे,बालाजी चौधरी, राकेश कोंडागुरला, कवि खोब्रागडे आदी नामकिंत व्यक्ति ची उपस्थिति मध्ये मुलांचे भव्य स्वागत करण्यात आले.