Friday, October 23, 2026
spot_img
HomeMul*पोलीस स्टेशन मुल पोलिसांची कामगिरी*

*पोलीस स्टेशन मुल पोलिसांची कामगिरी*

*पोलीस स्टेशन मुल पोलिसांची कामगिरी*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत कायदा सुव्यवस्था राहावी आणि DJ चा आवाज जास्त मोठा होऊ नये म्हणून पोलीस गस्त घालत होते. दिनांक २१/१०/२०२६ रोजी मूल शहरातील गांधी चौक परिसरात ‘दरार दुर्गा मंडळ’ च्या मिरवणुकीत DJ वाहनांची तपासणी केली.
तपासणीत Sound Level Meter यंत्राने तपासले असता DJ चा आवाज सरकारी नियमानुसार जी मर्यादा आहे, त्यापेक्षा जास्त मोठा असल्याचे आढळले. पोलिसांनी DJ मालक आणि मंडळाच्या अध्यक्षांना आवाज कमी करायला सांगितले, पण त्यांनी पोलिसांचे ऐकले नाही.
म्हणून पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली.
*कोणावर कारवाई केली?*
१. संतोष प्रभाकर ठाकूरवार, वय ५१, रा. मूल (अध्यक्ष, दरार दुर्गा मंडळ)
२. अनिकेत रवी ननावरे, वय २२ (डीजे मालक व चालक)
३. अभिषेक चंद्रशेखर चीटलोजवार, वय २२, रा. मूल (डीजे मालक व चालक)
४. धीरज जुगलकिशोर घिचरे, वय ५१, रा. नागपूर (डीजे धुमाळ मालक व चालक)
५. लकी अनिल दुर्गे, वय १९, रा. बोरचांदली, ता. मूल (डीजे मालक व चालक)
*गुन्हा आणि जप्ती:*
यांच्यावर *गुन्हा क्र. ७३२/२०२६, BNS कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३८, १३६* अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
त्यांच्याकडून *५ वाहने DJ साहित्यासह* जप्त केली आहेत.
*एकूण किंमत: रु. ८५,२१,०००/- (पंच्याऐंशी लाख एकवीस हजार रुपये)*
ही कारवाई मूल पोलिसांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page