Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeCrimeजिल्ह्यात दोन दिवसात तीन हत्या, हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा...

जिल्ह्यात दोन दिवसात तीन हत्या, हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या, राजू झोडे यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी

जिल्ह्यात दोन दिवसात तीन हत्या, हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या, राजू झोडे यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी

श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन हत्याकांड झाले असून जिल्हा हादरून गेला आहे.गुंडेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असून पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे घडलेल्या तिन्ही हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे केली आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात पती ने पत्नीची गळा चिरून हत्या केली, तर बल्लारपूर शहरात प्रेमप्रकरणातून मुलीची युवकाने निर्णम हत्या केली.तर शनिवारी चंद्रपूर शहरातील अष्टभुजा येथे धारधार शस्त्राने गळा चिरून एका युवकाची हत्या करण्यात आली. जिल्ह्यात गुन्हेगारी डोके वर काढत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही.तसेच स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा आरोपींपर्यंत पोहोचण्यास नाकाम होत आहेत.त्यामुळं आता पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस निरीक्षकांना आदेश द्यावे, तसेच गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश लावावा अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page