Sunday, September 13, 2026
spot_img
HomeFestivalsबल्लारपुर येथे महाशिवरात्रि महोत्सव उत्साहात संपन्न

बल्लारपुर येथे महाशिवरात्रि महोत्सव उत्साहात संपन्न

बल्लारपुर येथे महाशिवरात्रि महोत्सव उत्साहात संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:

श्री. नागदेवता गुरुदेव बहुउद्देशीय सेवा मंडळ, राजेंद्र वॉर्ड, बल्लारपुर यांच्या वतीने आयोजित महाशिवरात्रि महोत्सव मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी कलश यात्रेने झाली. गणपती घाट ते राममंदिरपर्यंत निघालेल्या यात्रेत महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. “हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

सायंकाळी सार्वजनिक श्री नागदेवता मंदिर येथे विधीवत घटस्थापना पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री रणंजय सिंह (अध्यक्ष, भाजप बल्लारपुर शहर), मा. श्री मोहित डोंगरे तसेच श्री नफीस अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे महत्त्व अधोरेखित करत समाजात एकता, सद्भावना व धार्मिक संस्कार जपण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आयोजकांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page