जड वाहतूक, वायू प्रदूषण आणि बेकायदेशीर वसुलीबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर (CBI) आणि (ED) चौकशी करा
सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांची मागणी
श्रेयश वानखेडे: चंद्रपूर जिल्ह्यातील जड वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मा. मोरे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मोरे हे जड वाहतूकदारांकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल करत आहेत आणि त्यांनी मिळवलेल्या पैशाने बेकायदेशीररित्या संपत्ती जमा केली आहे, असा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे. बेले यांनी (CBI) आणि (ED) ला मोरे यांच्याविरोधात चौकशीची मागणी केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मोरे हे जड वाहतूकदारांकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल करत आहेत. या पैसे वसुलीमुळे वाहतूकदारांवर आर्थिक ओझे वाढत आहे. वाहतूकदार वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करत नाहीत. मोरे यांनी मिळवलेल्या पैशाने बेकायदेशीररित्या संपत्ती जमा केली आहे. जड वाहतूकमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
त्यामुळे किरण मोरे यांची सीबीआय आणि ईडि द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे.