Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeEducationआमदार श्री. सुधाकर अडबाले यांची दहावी, बारावी परीक्षेबाबत चर्चा

आमदार श्री. सुधाकर अडबाले यांची दहावी, बारावी परीक्षेबाबत चर्चा

आमदार श्री. सुधाकर अडबाले यांची दहावी, बारावी परीक्षेबाबत चर्चा

श्रेयश वानखेडे:
आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी नागपूर बोर्ड येथे दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत विभागीय सचिव चिंतामण वंजारी, सहसचिव रवींद्र काटोलकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयावर सर्व शिक्षकांचा विरोध असून सदर निर्णय स्थगित करण्यात यावा, याबाबत आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी भूमिका मांडली.
याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने नागपूर / अमरावती विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, प्रांतीय कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर जिल्हा अध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, महानगर कार्यवाह अविनाश बडे, कार्याध्यक्ष विजय गोमकर, लक्ष्मीकांत व्होरा, मंगेश घवघवे, निजाम सर, गंगाधर पराते, कर्णबोधी सर, दिलीप बांबल, बिजवे सर, बिजवे मॅडम, मिर्झापुरे मॅडम, किरण भूजाडे, गजानन भोरळ आदींची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page