साईराज भैया बोराडे मित्र मंडळ आयोजित SPL 2025 चे फायनल संपन्न.
श्रेयश वानखेडे:
दि.26जानेवारी पासून सुरू झालेल्या SPL मध्ये एकूण 8 टीम सहभागी होत्या या मध्ये श्री संत गोविंदबाबा वॉरियर्स व सरपंच एलेवन गुगळी धामणगाव यांच्या मध्ये अंतिम सामना रंगला.
प्रथम फलंदाजी केलेल्या सरपंच एलेव न टीम ने ठेवलेले टार्गे ट श्री संत गोविंदबाबा वॉरियर्स ने अतिशय अलगद रित्या पूर्ण करून लीग जिंकण्याचा मान मिळविला त्यांना प्रथम पारितो षिक रु51000 व भव्य 5फूट ट्रॉफी मिळाली व सरपंच एलेवन यांना द्वितीय पारितोषिक रु 21000 व भव्य 4फूट ट्रॉफी देण्यात आली. सेलू शहरातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून देण्या चा उद्देश या वेळी पूर्ण होताना दिसला.या लीग मध्ये शहरातील जवळपास 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सेलू तालुका खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष मुकेश भाऊ बोराडे, माजी प्राचार्य शरद कुलकर्णी सर,मा. उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,व्यंकटेश बापू चव्हाण, निवृत्त क्रीडा शिक्षक नागेश कान्हे कर सर, क्रीडा शिक्षक गणेश माळवे,ह. भ. प. प्रसाद म. काष्टे, राजेंद्र पवार,व्यंकटेश काबरा, वल्लभजी राठी, राजेंद्र करवा,महेश तोषनी
वाल,विलास सोलापुरे, प्रकाश हरकळ आदी उपस्थित होते.