Wednesday, February 11, 2026
HomeEducation*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा*
spot_img

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा*

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा*

सौ. ज्योत्सना वानखेडे: 
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक हक्क दिन  दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी  साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक), यु. के. रांगणकर( शिक्षक)  होते.
प्रथमता: अल्पसंख्यांक हक्क दिनावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये माध्यमिक गटात:
तंजिल आरिफ शेख- प्रथम, मार्शल बेंजामिन डेविड- द्वितीय, हुजैल तैफिल बकरीदि- तृतीय तसेच प्राथमिक गटात:
रिजवान हमीद शेख- प्रथम, राजवीर दीपकसिंग बावरे- द्वितीय, ताज जहांगीर शहा- तृतीय
इत्यादी  विद्यार्थ्यांना क्रमांक प्राप्त झालेत.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे.
शाळेचे शिक्षक यु. के. रांगणकर  यांनी सांगितले की, अल्पसंख्यांकांना विविध प्रकारची शिष्यवृत्ती मिळते त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.
अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी विशद केले की, अल्पसंख्यांक मध्ये कोण कोण येत असते याबाबत माहिती दिली व त्यांचे हक्क व संरक्षण बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे, आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
 कार्यक्रम सफल करण्यास शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी हातभार लावला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page