श्रेयश वानखेडे:
दिनांक 30 जानेवारी 2024 ला महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू , तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे हुतात्मा दिन निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रकाश सर, सभी पारी प्रमुख , शिक्षक शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी तिन्ही माध्यमातील विद्यार्थ्या मार्फत सर्व धर्म प्रार्थना सादर करण्यात आली. श्री. पुणेकर सर यांनी बौद्ध धर्म प्रार्थना सादर केली. शहीद हुतात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ११ वाजता दोन मिनिट उभे राहून मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वैष्णव जन तो तेने कहिये ” महात्मा गांधी जी चे प्रिय भजन…. श्री. अजयपाल सूर्यवंशी सर तथा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका मिळून सादर करण्यात आले . या वेळी हार्मोनियम ची साथ श्री. दिलीप दातारकर यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन श्री. नंदकिशोर साळवे सर यांनी केले.अशी माहिती श्री. रवी अनसुरी सरांनी दिली.