Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeSanghtanaमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे ही लोकशाहीची हत्या, राजू झोडे

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे ही लोकशाहीची हत्या, राजू झोडे

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे ही लोकशाहीची हत्या, राजू झोडे

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोप स्पष्ट न करता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचे काम केंद्र सरकार ईडी व सीबीआय च्या माध्यमातून करत असल्याची टीका उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. निवडणुकीत भाजपला अपयश दिसत असून केंद्र सरकारचा झोडे यांनी निषेध केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे. अशा प्रकारे राजकारणाची पातळी घसरणे ना पंतप्रधानांना शोभते ना त्यांच्या सरकारला. निवडणुकीच्या लढाईत तुमच्या टीकाकारांशी लढा, त्यांचा धैर्याने सामना करा आणि अर्थातच त्यांच्या धोरणांवर आणि कार्यशैलीवर हल्ला करा, ही लोकशाही आहे. परंतु अशाप्रकारे देशाच्या सर्व संस्थांच्या शक्तीचा वापर करून स्वत:चे राजकीय उद्दिष्ट पूर्ण करणे आणि दबाव आणून त्यांना कमकुवत करणे हे लोकशाहीच्या प्रत्येक तत्त्वाच्या विरुद्ध आहे. त्यामुळं या सरकारला आता पायउतार करण्याची वेळ आली असल्याची टीका राजू झोडे यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page