Sunday, September 13, 2026
spot_img
HomeSanghtana*राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्ट ला बंगलोर येथे ११ वे महाअधिवेशन*

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्ट ला बंगलोर येथे ११ वे महाअधिवेशन*

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्ट  ला बंगलोर येथे ११ वे महाअधिवेशन*

* हिवाळी अधिवेशन दरम्यान दिल्लीत  ओबीसी कॉलम साठी ठिय्या आंदोलन होणार*

*ज्योत्स्ना वानखेडे*:राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच  महिला महासंघ, कर्मचारी-अधिकारी महासंघ, युवा महासंघ, किसान महासंघ, वकील महासंघ आणि विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १८ जुलै २०२६ चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका, चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.
या बैठकीत दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी  ज्ञानज्योती ऑडिटोरियम डॉ मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार करणार आहेत देशातील मंत्री,खासदार , आमदार उपस्थित राहणार आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसींचा कॉलम असावा ही मागणी प्रामुख्याने चर्चेली जाणार आहे. तसेच  २०२७ च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर  ठिय्या आंदोलनाच्या करण्यात  येणार आहे असे अध्यक्षीय भाषणात सचिन राजुरकर बोलत होते. जिल्ह्यातील सर्व तालुका, शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महाअधिवेशन व ठिय्या आंदोलनाच्या तयारीचा अहवाल, सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संभाव्य संख्या, वाहतूक व्यवस्था, संपर्क नियोजन तसेच इतर आवश्यक माहिती बैठकीला दिली.
या वेळी महिला महासंघाच्या अध्यक्षा भावना ताई बावनकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे , रणजीत डवरे उपस्थित होते  बैठकीचे प्रास्ताविक रामदास कामडी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, चंद्रपूर यांनी केले संचलन अक्षय येरगुडे आभार विधाते सर यावेळी सुधाकर काकडे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page