Thursday, January 22, 2026
HomeLekhलढूया स्वतःसाठी....
spot_img

लढूया स्वतःसाठी….

लढूया स्वतःसाठी….

मी अनेक दिवसापासून दिव्यांग बांधवासाठी शक्य होईल त्या प्रकारे काम करतेय त्यातून अनेकांना मदत झाली अनेकांच्या सुखाचे समाधानाचे कारण मला होता आले पण दरम्यान ते काम करत असताना एक गोष्ट माझ्या मनाला सतत जाणवते,,ती म्हणजे, दिव्यांग व्यक्तीला आधाराची,साथ,सोबतीची अतिशय आवश्यकता असते-आम्ही एकटे नाही आमच्या सोबत कोणीतरी आहे हि जाणीव त्यांना फार ताकद देते-उमेद देते-चेतना देते आणि यातून त्यांना काहीतरी करण्याची स्पुर्ती मिळते-त्यांच्यात जिद्द येते…
परंतु माझ्या विचाराला हे काही अंशी पटत नाही,,आपण अपंग आहोत किंवा आपल्यात काहीतरी कमी आहे हि भावना मनात असणे माझ्या मते साफ चुकीची आहे-
या जगात कोणीही परिपूर्ण नाहीये-प्रत्येकात काहीतरी कमी असतच -अर्थात त्याचे प्रकार वेगवेगळे असतील पण सर्वच सर्वाकडे अजिबात नसतं-
त्यामुळे आपण अपंग आहोत-आपल्याकडे काहीही नाही हा विचार बाजूला फेकून जे आहे,जसं आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सक्षम करत स्वतःच अस्तित्व म्हणा-स्वतःच विश्व म्हणा,ते निर्माण करण्याच्या प्रयत्नात रहा-कोणावरही अवलंबून राहू नका-आपल्या आयुष्याच्या अस्तित्वाची ही लढाई असते ती आपण स्वतःच्या जिद्दीने लढायची…
तक्रारी करण्यापेक्षा-कोणाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण हळू हळू सावरण्याचा-पुढे जाण्याच्या प्रयत्नात राहूया-उशीर होईल अडचणी येतील,त्रास होईल-यश मिळेल अथवा मिळणार नाही, हा मुद्दा बाजूला ठेऊया पण आपण आपल्या हिमतीवर काहीतरी करतोय याचे समाधान आपल्या चेहऱ्यावर कायम असेल आणि यातूनच आपल्या अनेक दिव्यांग बांधवाना प्रेरणा मिळतं राहील….
आणि मनापासून प्रयत्न करायला सुरवात केली ना,निसर्ग आपसूक ताकद देतो-एक ऊर्जा आपल्या सोबत नक्की उभी राहते….
म्हणून लढूया स्वतःसाठी…
रामेश्वर भोरे जॉईन सेक्रेटरी ब्लाइंड क्रिकेट अससिएशन महाराष्ट्र ऍण्ड चंद्रपूर ब्लाइंड क्रिकेट टीम कोच ऍण्ड मॅनेजर
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page