Saturday, March 14, 2026
HomeEducationलाचखोर शाळा संचालकांना धडा शिकवा- नागो गाणार
spot_img

लाचखोर शाळा संचालकांना धडा शिकवा- नागो गाणार

लाचखोर शाळा संचालकांना धडा शिकवा- नागो गाणार

पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर शिपाई म्हणून नोकरीस लागलेल्या मुलाला कायम करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयाची लाच  स्विकारणाऱ्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व एका शिक्षिकेस चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी रंगेहात पकडून अटक केली. सदर घटना महात्मा फुले विद्यालय तथा महाविद्यालय गिरगांव, ता. नागभीड, जिल्हा चंद्रपूर या शासनमान्य व अनुदानप्राप्त शाळेतील आहे.

शिक्षक/ कर्मचाऱ्यांची शाळा संचालकाकडून वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक लुबाणूक केली जाते हे सर्वश्रुत आहे. भितीपोटी शिक्षक /कर्मचारी शाळा संचालकांच्या आर्थिक लुबाडणुकीस सातत्याने बळी पडतात.  नियुक्तीच्या वेळेस २० ते २५ लाख रुपये, नियुक्ती मान्यतेसाठी २ ते ५ लाख रुपये व शालार्थ आयडी करीता २ लाख रुपयाची लाच घेतली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या वेतनातून  ५ टक्के ते २० टक्के रक्कम शिक्षक कर्मचाऱ्यांकडून खंडणीच्या स्वरूपात वसूल केली जाते. तसेच शिक्षक/ कर्मचाऱ्यांना वेतन वाढ, वरिष्ठ/ निवड श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, सेवानिवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधी प्रकरणी शाळा संचालकांनी निश्चित केलेली लाच देणे भाग पडते. शाळा संचालकांवर शासनाचे व प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे शाळा संचालक निर्धास्तपणे  शिक्षक/ कर्मचाऱ्यांची लूट करण्यात मश्गुल झाले आहेत. शाळा संचालकांच्या लूटमारीत शिक्षण विभागाचे अधिकारी सहभागी असल्याचे सुद्धा निदर्शनात येते. शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी लाचखोर शाळा संचालकांच्या  पे रोलवर असल्याची सर्वत्र चर्चा आहे. शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची लाचखोर शाळा संचालकांसोबत साठगाठ असून लाचखोरीत त्यांचा सहभाग असतो, ही अत्यंत खेदजनक व गंभीर स्वरूपाची बाब असून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे.

यासाठी लाचखोर शाळा संचालकांना धडा शिकवण्याकरिता कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई करावी. तसेच लाचखोर शाळा संचालकांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षक कर्मचाऱ्यांना करण्यात यावे.

अशा प्रकारचे निवेदन मान. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे मार्फत मान. शिक्षण सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, मान. शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, मान. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे,  मान. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान. नागो गाणार माजी शिक्षक आमदार व राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी जावक क्रमांक- एन.जी./ माजी/ वि.प.स. ६२३/२४ दिनांक: १०/०४/२०२४ रोजी दिले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page