Monday, January 19, 2026
HomeCrimeकोठारी येथे विदेशी दारू वाहतूक करताना बड्या नेत्याच्या साळ्याला अटक
spot_img

कोठारी येथे विदेशी दारू वाहतूक करताना बड्या नेत्याच्या साळ्याला अटक

कोठारी येथे विदेशी दारू वाहतूक करताना बड्या नेत्याच्या साळ्याला अटक

लोकसभा निवडणूक च्या पार्श्वभूमीवर दारू ची वाहतूक करताना एका बड्या नेत्याच्या साळ्याला अटक केल्याने राजकरण तापले आहे.
        तालुक्यातील कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू ची वाहतूक करताना तोहगाव ता. गोंडपिपरी येथील आशिष सुरेश मोरे याला १६ एप्रिल चा रात्री ११.३० वाजता अटक केले. तो जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा साळा असून त्याचे भाऊजी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा राजुरा विधान सभा समन्यवक आहे.
        लोकसभा निवडणूक च्या पार्श्वभूमीवर कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत  फिरते पथक 3 यांनी दिलेल्या माहिती वरुन नाकाबंदी दरम्यान पंचा समक्ष महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक MH-34-AM-3709 ची पाहणी केली असता वाहनाचे वाहना मध्ये चालकाच्या पुढच्या सिट च्या बाजुला एका खाकी रंगाच्या खरड्याचा खोका मिळून आला पंचा समक्ष सदर खोक्यास उघडुन बघीतले असता त्यामध्ये व्हिस्की आढळून आली. असा एकुण 6990/- रुपयाचा मुद्देमाल व दारुची वाहतुक करण्या करीता वापरलेले महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक MH-34-AM-3709 अं.किं 4,00,000/- असा एकूण 4,06,990/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा गुन्हात वापरलेली बोलेरो गाडी जप्त करण्यात आली आहे.
       सदर कारवाई कोठारी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गजानन तोटवार , पोहवा विजय रॉय, पोशी साईनाथ उपरे यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page