Wednesday, January 14, 2026
HomeEducationइतिहास विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने प्रज्ञा शोध परिक्षा आयोजित
spot_img

इतिहास विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने प्रज्ञा शोध परिक्षा आयोजित

इतिहास विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने प्रज्ञा शोध परिक्षा आयोजित

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे डॉ. किशोर चौरे यांनी दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने प्रज्ञा शोध परिक्षा घेण्यात आली विशेष म्हणजे यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याशी संबंधित विषयावर परिसवाद, त्यांच्या विचारधारेवर आधारित ग्रंथउत्सव, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात याव्या अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने महात्मा फुले महाविद्यालयात प्रज्ञा शोध परिक्षा घेण्यात आली या परीक्षेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर परिक्षा डॉ. बादलशाह चव्हाण प्रभारी प्राचार्य, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.किशोर चौरे,(इतिहास विभागप्रमुख) यांनी घेतली व सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page