Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeChandrapurबल्लारपूर चा सुगंधीत तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर यांचेवर गुन्हा दाखल

बल्लारपूर चा सुगंधीत तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर यांचेवर गुन्हा दाखल

बल्लारपूर चा सुगंधीत तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर यांचेवर  गुन्हा दाखल

श्रेयश वानखेडे:
 सुगंधित तंबाखू विक्री प्रकरणी बल्लारपूर चा सुगंधित तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर यांचेवर रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे. या प्रकरणी एका तंबाखू विक्रेता ला अटक केले.
       दिनांक २९/०४/२०२४ रोजी रात्रौ दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग करीत होते. दरम्यान मुखबिरचे खबरे वरून आरोपी नामे महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी. एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचे घराची तसेच त्यांने किरायाने घेतलेल्या खोलीची पंचा समक्ष झडती घेतली असता, सदर दोन्ही ठिकाणी ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण २,१४,२२०/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी नामे महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी.एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास जप्त सुगंधीत तंबाकु बाबत विचारणा केली असता त्यांनी नामे जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह जि. चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगरचे ताब्यात देण्यात आले.
       सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा /११७६ किशोर वैरागडे, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page