माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे प्रचंड भ्रष्टाचार
बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ आयडी धारक कर्मचाऱ्यांचे पगार सुरू
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील एका शाळेच्या 11 कर्मचाऱ्यांना बोगस मान्यता प्रदान करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या बोगस शालार्थ आयडी बनवण्यात आल्या होत्या. त्यांना मान्यता प्रदान करताना त्यांच्या फायली माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे अस्तित्वात नाहीत. तसेच शालार्थ आयडी बनवत असताना भविष्य निर्वाह निधी वेतन पथक चंद्रपूर तर्फे कोणतेच कागदपत्र अस्तित्वात नाहीत.
असे असताना मार्च महिन्यात शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व भविष्य निर्वाह निधी पथक चंद्रपूर यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी साठगांठ करून या 11 बोगस मान्यता प्रदान असलेल्या व बोगस शालार्थ आयडी असलेल्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन काढलेले आहे.
तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांची बदली झाल्यानंतर हा कारनामा झाला आहे.
सदर कारस्थान कोणाच्या भरवशावर( पाठबळावर) घडवून आणले हा संशोधनाचा विषय आहे.
विद्यमान शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाही.
भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक चंद्रपूर यांचे विद्यमान अधिकारी( अधीक्षक) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मला याबद्दल काही कल्पना नाही ही बाब मी चार्ज घ्यायच्या आधीची आहे.
मान. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्याशी फोनवरून संपर्क करून त्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी असे सांगितले की, मला याबद्दल काहीच कल्पना नाही आणि माझ्याकडे मागे तक्रार प्राप्त झाली होती तेव्हापासून पगार बंद होता. पगार सुरू कसा झाला. याबाबत आपण माझ्याकडे तक्रार करा. संबंधितावर कारवाई करून पगार वसुली करण्यास आदेश देणार.