Saturday, April 18, 2026
HomeChandrapurसुबोध जुन्नावार यांचे सं. गां. यो. व अपंग प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी
spot_img

सुबोध जुन्नावार यांचे सं. गां. यो. व अपंग प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी

सुबोध जुन्नावार यांचे सं. गां. यो. व अपंग प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी

संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. ब्रिजभूषण पाझारे यांनी दिले तहसीलदार व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन
Shreyash Wankhede:
चंद्रपूर  येथील सुबोध जुन्नावार यांना संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मंजुरी मिळाल्या वरून त्यांचेवर आक्षेपाचे ताशेरे ओढण्यात आले यावरून चंद्रपूर महानगराचे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. ब्रिजभूषण पाझारे यांनी सखोल चौकशी करून शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे यांचेकडे सुबोध जुन्नावार यांचे अपंग प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे.
संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. ब्रिजभूषण पाझारे यांच्या अध्यक्षतेखाली ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत सुबोध जुन्नावार यांना अपंग प्रमाणपत्र, तलाठी अहवाल व त्यांनी सादर केलेल्या इतर कागदपत्राच्या आधारे या योजनेसाठी पात्र ठरविले. परंतु मुळात त्यांची परिस्थिती अत्यंत चांगली असून राजकीय माध्यमातून अपंग प्रमाणपत्र मिळवून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे श्री. पाझारे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना अपंग प्रमाणपत्र व तहसीलदार सं. गां.यो. यांना योजनेचे लाभार्थी पात्र प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याबाबत निवेदन सादर केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page