Wednesday, January 14, 2026
HomeEducationप्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आणि तत्कालीन अधीक्षक वेतन...
spot_img

प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आणि तत्कालीन अधीक्षक वेतन पथक चंद्रपूर यांच्यावर कठोर कारवाई करावी- म. रा. शि. प.

प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आणि तत्कालीन अधीक्षक वेतन पथक चंद्रपूर यांच्यावर कठोर कारवाई करावी- म. रा. शि. प.

Shreyash Wankhede:

11 कर्मचाऱ्यांच्या बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ आयडीबाबत तत्कालीन मान. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिनांक: 27/06/ 2022 रोजी सुनावणी घेऊन व नस्ती यांची तपासणी केली असता सदर नस्ती कार्यालयात दिसून आल्या नाहीत. मान्यता आदेश नियमाप्रमाणे व विविध यंत्रणे मार्फत गेलेले नाहीत. कार्यालयीन लिपिकाला विचारणा केली असता सदर नस्ती आमचे मार्फत सादर करण्यात आली नाही असे लेखी बयान सादर केले. कार्यालयाचे जावक रजिस्टर तपासले असता रजिस्टर मध्ये नोंद नाही व आदेश क्रमांक खोडतोड केलेले आहेत. अहवालातील एकूण 11 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ आयडी प्रस्ताव  वेतन पथक चंद्रपूर यांचे मार्फत पाठवण्यात आलेले नाही. असे मान. अधीक्षक वेतन पथक यांचे लेखी बयान आहे.

अशा प्रकारचा सविस्तर अहवाल मान. शिक्षण उपसंचालक नागपूर यांना दिनांक: 11/07/2022 रोजी पाठवण्यात आला. तत्कालीन प्रभारी शिक्षण अधिकारी यांनी वरील मान्यता गैरप्रकार करून दिलेल्या आहेत व त्या सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक यांनी आपले स्तरावरून कारवाई करावी असे तत्कालीन शिक्षण अधिकारी( बदली झालेल्या) यांनी कळविले आहे.

वरील अहवाल पाठवून दीड वर्ष झाली मात्र वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीबाबत शिक्षण उपसंचालक यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे  संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन तत्कालीन अधीक्षक यांनी काढले नाही.

मात्र सध्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आणि तत्कालीन अधीक्षक वेतन पथक यांचा प्रभार असताना यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी हात मिळवून भ्रष्ट मार्गाने 11 कर्मचाऱ्यांचे वेतन नियमबाह्य प्रमाणे मार्च 2024 पासून काढले, याबाबतीत वेतन पथक कार्यालयातील लिपिक यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. वरिष्ठांकडे प्रकरण प्रलंबित असताना वेतन काढून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावलेला आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे.

अशा प्रकारची तक्रार मान. मधुकर मुप्पीडवार उपाध्यक्ष म.रा. शि. प. नागपूर विभाग यांनी पत्र क्रमांक/ मराशिप/शिउपा/ 105/ 2024 दिनांक: 3/05 /2024 रोजी 1) मान. शिक्षण आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे, 2) मान. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे, 3) मान. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर तसेच मान. नागो गाणार माजी विधान परिषद सदस्य नागपूर यांना केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page